Shreya Maskar
कडू कारल्याची चटपटीत चटणी बनवण्यासाठी कारली, शेंगदाणे, चणा डाळ, उडीद डाळ, धणे, जिरे, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, चिंच, हिंग, तेल, लसूण, मीठ इत्यादी साहित्य लागते.
कारल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळवून घ्या. त्यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या.
कारल्याचे छोटे छोटे पातळ बारीक काप करून घ्यावेत. काप जास्त जाड ठेवू नये. कडू लागतात.
एका पॅनमध्ये शेंगदाणे, चणा डाळ, उडीद डाळ, धणे, जिरे, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, हिंग, चिंच चांगले भाजून घ्या. तुम्हाला आवडत असलेला एखादा मसाला यात टाका.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसणाची बारीक पेस्ट टाका. यात कारल्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
आता मिक्सरच्या भांड्यात कुरकुरीत काप आणि भाजलेले सारण चांगले वाटून घ्या. चटणी बारीक वाटा. जेणेकरून मुलांना खूप आवडेल.
चटणी एका बाऊलमध्ये काढून यात मीठ ओता. तयार चटणी तुम्ही 1 महिना हवाबंद डब्यात ठेवू शकता. हिवाळ्यात ही चटणी जेवणाची रंगत वाढवेल.
कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी बिया काढून मीठ लावून ठेवून द्या. तसेच कोवळ्या कारल्याचा वापर करा.