Shreya Maskar
ख्रिसमस सध्या सर्वत्र साजरा करताना दिसत आहे. ख्रिसमसला घरीच मुलांचे आवडते मफिन्स बनवा. सिंपल रेसिपी नोट करा.
बनाना मफिन्स बनवण्यासाठी केळी, मैदा, साखर, तूप, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पूड, मीठ, दूध, काजू, बेदाणे इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
बनाना मफिन्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये केळी मॅश करून घ्या. त्यात आवडीनुसार साखर आणि तूप घालून चांगले एकत्र करून घ्या.
दुसऱ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, केळ्याचे मिश्रण आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.
त्यानंतर यात दूध टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्ही या मिश्रणात चोको चिप्स देखील टाकू शकता.
मफिन्सच्या साच्याला तूप लावून त्यात चमच्याने मिश्रण भरा. वरून त्यात काजू, बेदाणे टाका. तुम्हीला आवडते ते टॉपिंग तुम्ही बनाना मफिन्सवर करू शकता.
ओव्हनमध्ये ४०-५० मिनिटे बनाना मफिन्स मस्त बेक करा. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील मफिन्स बेक करू शकता.
तुम्हाला बनाना मफिन्स अजून डेकोरेट करायचे असतील तर त्यावर चॉकलेट किंवा व्हॅनिला क्रिम लावा आणि त्यावर कलरफुल चॉकलेटने सजवा.