Shreya Maskar
कोकम चटणी कोकणात खूप प्रसिद्ध आहे. कोकम पचनासाठी चांगले असते आणि शरीराला थंडावा देते. त्यामुळे याचा आवर्जून आस्वाद घ्या.
कोकम चटणी बनवण्यासाठी कोकम, मीठ, साखर, खोबरं, हिरवी मिरची, आलं, आमसूल पावडर, हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल इत्यादी साहित्य लागते.
कोकम चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम ओल्या नारळ भरपूर किसून घ्या. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरा.
मिक्सरच्या भांड्यात खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं आणि आल्याचा बारीक तुकडा टाकून एक जाडसर पेस्ट बनवून घ्या.
चटणी जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. यात पाणी टाकू नका.
तयार पेस्ट बाऊलमध्ये काढून यात साखर, आमसूल पावडर, चवीनुसार मीठ आणि लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
छोट्या भांड्यात तेल गरम करून त्यात कढीपत्ता, हिंग, जिरे याची फोडणी तयार करा आणि कोकम चटणीवर टाका.
गरमागरम भाकरी, भात, चपातीसोबत कोकम चटणीचा आस्वाद घ्या. हा पदार्थ हिवाळ्यात आवर्जून बनवा. याची चव खूपच भन्नाट लागेल.