लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर एनडीएने बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. यात भाजप 17 तर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे. यासोबतच चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) 5 जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली.
यासोबतच जीतन राम मांझी यांच्या पक्ष हमला 1 जागा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएमओला 1 जागा देण्यात आली आहे. तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती जाहीर केली आहे. यावेळी भाजप बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, जेडीयू नेते संजय झा आणि इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप बिहारमध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर आणि सासाराम या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे. (Latest Marathi News)
तसेच नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू वाल्मिकी नगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शेओहर या 16 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.
बिहारमधील हाजीपूर, वैशाली, खगरिया, समस्तीपूर आणि जमुई या 5 लोकसभेच्या जागा चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलास लढवणार आहेत. जीतन राम मांझी यांच्या पक्ष हम गया येथून आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएमओ काराकाट येथे आपला उमेदवार उतरवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.