Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे 17 उमेदवार फायनल? कोणाला कुठून मिळू शकते उमेदवारी? जाणून घ्या

Thackeray Group News: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे 17 उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

Thackeray Group Candidates List:

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे 17 उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविआत कल्याण-डोंबिवली, पालघर, जालना या तीन जागांवर अद्यापही कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र कल्याण-डोंबिवली या लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला असल्याचं सांगितलं जात आहे. यातच ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे.  

असं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर झाल्याच्या बातम्या या खोट्या आहेत अजून आमची कोणतीही यादी जाहीर झाली नाही. आमच्या उमेदवारांची यादी स्वतः उद्धव ठाकरे हे जाहीर करतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : 'दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांनी घरे फोडण्याचे लायसन्स घ्यावे'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची नावे

  • उत्तर मुंबई - विनोद घोसाळकर

  • ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील

  • दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

  • दक्षिण पश्चिम मुंबई - अनिल देसाई

  • छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

  • बुलढाणा - नरेंद्र खेडकर

  • यवतमाळ - संजय देशमुख

  • उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (Latest Marathi News)

  • परभणी - बंडू जाधव

  • शिर्डी - वाघचौरे

  • नाशिक - विजय करंजकर

  • ठाणे - राजन विचारे

  • रायगड - अनंत गिते

  • हिंगोली - नागेश आष्टीकर

  • रत्नागिरी - सिंधुदुर्ग- विनायक राऊत

  • सांगली - चंद्रहास पाटील

  • मावळ - संजोग वाघेरे

Uddhav Thackeray
MP Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगरमधून खासदार इम्तियाज जलील पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; ओवेसींची अधिकृत घोषणा

2019 मध्ये शिवसेनेने 22 जागांवर लढवली होती निवडणूक

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. त्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत युती करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेली होती. राज्यातील 48 पैकी 22 जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 3 जागा मुंबईतील होत्या. यातील 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता.

पुढे जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत फूट पडली. यातच शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सत्ता स्थापना केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळालं. सध्या शिंदे गटाकडे 12 खासदार आहेत. तर ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com