MP Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगरमधून खासदार इम्तियाज जलील पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; ओवेसींची अधिकृत घोषणा

MIM Party Lok Sabha Candidate: छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी एमआयएमचा उमेदवार ठरला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
MP Imtiaz Jaleel
MP Imtiaz JaleelSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे

Lok Sabha Election 2024 Maharshtra Politics

मागील काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील (MIM Party Lok Sabha Candidate) यांच्या उमेदवारीविषयी चर्चा होत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांनी छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई या मतदारसंघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी देखील दाखवली होती. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (latest politics news)

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीत (Maharshtra Politics) 'एमआयएम'कडून खासदार इम्तियाज जलील लढणार आहेत. संभाजीनगरमधून लोकसभेसाठी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी एमआयएम पक्षाकडून निश्चित केली गेली (Lok Sabha Candidate) आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली गेली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांअगोदर खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली (Lok Sabha Election 2024) होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. खासदार इम्तियाज जलील आता पुन्हा एकदा संभाजीनगरमधूनच लढणार आहेत. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली (Lok Sabha 2024) आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. त्यामुळे मागील लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एमआयएम'चा उमेदवार निवडून आला होता. आता पुन्हा एकदा एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. एमआयएम पक्ष लोकसभेच्या ६ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय.

MP Imtiaz Jaleel
Madhya Pradesh Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, विद्यमान खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी एमआयएमकडूम (MIM) खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसह तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

यामध्ये हैदराबादमधून ते स्वत: (असदुद्दीन ओवेसी) (MIM Party Chief Asaduddin Owaisi) निवडणूक लढवणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आणि बिहारच्या किशनगंजमधून अख्तरुल इमाम यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

MP Imtiaz Jaleel
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com