mahesh chivate
mahesh chivate saam tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Election 2024 : महेश चिवटेंनी शिवसेनेचा तमाशा केला : महावीर देशमुख

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे (mahesh chivate) आणि शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत (shivaji sawant) यांच्या कार्यकर्त्यांच्या आराेप प्रत्याराेपमुळे माढा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेतील (shivsena) अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या वादाचा फटका माढा लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (mp ranjitsinh naik nimbalkar) यांच्या प्रचाराला बसणार की काय याची चर्चा हाेऊ लागली आहेे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष महावीर देशमुख (mahaveer deshmukh) यांनी उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर मनमानीचे आरोप केलेत. ते म्हणाले शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेनेचा तमाशा केला आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवून आणि उमेदवाराच्या खिशाकडे पाहून महेश चिवटेंचे काम असल्याचेही देशमुख यांनी म्हटले.

महावीर देशमुख म्हणाले आमचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांना बदनाम करण्याचा डाव उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्याकडून टाकला जात आहे. आम्ही शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात उतरणार आहाेत. शिवसेना ताकदीने या निवडणुकीत सक्रिय असल्याचेही महावीर देशमुख यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Rashi Bhavishya : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, वाचा राशिभविष्य

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया सणाला आहे खास महत्व; तुम्हाला आहे का ही माहिती? जाणून घ्या

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

SCROLL FOR NEXT