Prakash Ambedkar Saam TV
लोकसभा २०२४

Prakash Ambedkar News: अकोल्यात प्रकाश आंबेडकर खासदारकीपासून वंचित! भावुक पोस्ट करत म्हणाले, 'आशा सोडलेली नाही...'

Akola Loksabha Election Result: अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेस उमेदवार अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली.

Gangappa Pujari

अकोला, ता. ४ जून २०२४

राज्याचे लक्ष लागलेल्या अकोला लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पराभव स्विकारावा लागला आहे. अकोल्यात 2 भाजप उमेदवार अनुप धोत्रे हे विजयी झाले आहेत. अकोल्यात झालेल्या पराभवानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत जनतेचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

"लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक VBA कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला," असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

तसेच पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू.वंचित बहुजन आघाडी विजय असो!, असेही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेस उमेदवार अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत अनुप धोत्रे यांनी पहिल्यापासून आघाडी कायम ठेवत बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

SCROLL FOR NEXT