Akola Loksabha Constituency News: Saamtv
लोकसभा २०२४

Akola News: अकोल्यात महाविकास आघाडीचं ठरलं! डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Maharashtra Politics News: अकोल्यामध्ये आता महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून काँग्रेसचे डॉ. अभय पाटिल हेच अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. ३१ मार्च २०२४

Akola Loksabha Constituency News:

महाविकास आघाडीत अकोल्याच्या उमेदवारीवरुन संभ्रम असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, अकोल्यामध्ये आता महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हेच अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर असे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये डॉ. अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 4 एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे नामाकांन अर्ज दाखल करणार आहेत. "तयारी लागा! 4 एप्रिलला अर्ज दाखल करायचा आहे, दोन दिवसांत AB फॉर्म देणार आहे, अशा वरिष्ठ पातळीवरुन सुचना आल्याचेही डॉ. अभय पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अकोल्यात लोकसभेसाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. तर महायुतीकडून अनूप धोत्रे हे निवडणूक लढ़वणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात खळबळ! वडील चिडले म्हणून १६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

Nanded News: आईनेच मुलाला झोपडीत बांधून ठेवलं, पाहा VIDEO

शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; आमदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ | VIDEO

Maharashtra Politics : बीडचं राजकारण फिरलं; मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं,VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली नांदणी जैन मठाला भेट

SCROLL FOR NEXT