Lightning Strike : बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस; वीज पडून मुलाचा मृत्यू, तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार

Beed News : राज्यात येत्या काही दिवसात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

बीड : हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून (Beed) बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. या दरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे. (Tajya Batmya)

Lightning Strike
Jalgaon Crime News : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सालदाराला संपविले; सावद्यातील थरारक घटना

राज्यात येत्या काही दिवसात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु असताना विजांचा कडकडाट (Lightning Strike) देखील झाला. यात गेवराई तालुक्यात वीज पडून एका मुलाचा तर (Ashti) आष्टी तालुक्यातील गौखेल येथे बैल जोडीचा मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lightning Strike
Police Recruitment : मराठा आरक्षणासाठी पोलीस भरतीच्या नोंदणीला मुदत वाढ; १५ एप्रिलपर्यंत करता येतील अर्ज

आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज 

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे आंब्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com