Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 चा 'सेम टू सेम' पॅटर्न चर्चेत?; कुणाचं गणित बिघडणार?

Lok Sabha Election 2024 : 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारांचा सेम टू सेम पॅटर्न चर्चेत आलाय. रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या नावाचे डमी उमेदवार उतरलेत. हातकणंगले मतदारसंघातही तशीच परिस्थिती आहे.

Sandeep Gawade

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारांचा सेम टू सेम पॅटर्न चर्चेत आलाय. रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या नावाचे डमी उमेदवार उतरलेत. हातकणंगले मतदारसंघातही तशीच परिस्थिती आहे. राजकारणातला सेम टू सेम पॅटर्न नेमका काय आहे आणि या पॅटर्नमुळे कुणाला फटका बसणार आहे पाहुयात या रिपोर्टमधून.

आता तुम्ही म्हणाल नेमकं यांना सांगायचंय तरी काय पण अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालीय. आता निवडणूक म्हटलं की प्रचार आला. सभा आल्या, आरोप प्रत्यारोप आले. एवढच काय तर आपल्य़ा उमेदवाराला जिंकवण्यासाठी समोरच्यांची मतं फोडली जातात, अगदीच वेळतर समोरची माणसंही फोडली जातात. मात्र हातकणंगले आणि रायगडमध्ये वेगळीच शक्कल लढवण्यात आलीय. विरोधी उमेदवाराची मतं फोडण्यासाठी सेम टू सेम नावाचे उमेदवार उभे करण्यात आलेत.

रायगडमध्ये 'सेम टू सेम'

रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र निव़डणुकीच्या रिंगणात आता तीन अनंत गीते आणि दोन सुनील तटकरे यांच्यात लढत होणार आहे. ठाकरे गटाच्या अनंत गीतेंविरोधात अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते असे नाम साधर्म्य असलेले दोन उमेदवार आहेत. तर अजित पवार गटाच्या सुनील दत्तात्रय तटकरे यांच्याविरोधात सुनील तटकरी नावाचे उमेदवार उभे राहिलेत.

हीच परिस्थिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही निर्माण झालीय. शिंदे गटाच्या धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे उमेदवारी सत्यजित पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार शोधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत..

सेम टू सेम.. राजू शेट्टी

2019च्या निवडणुकीतही राजू शेट्टींना अशाच डमी उमेदवाराचा फटका बसला होता. बहुजन महापार्टीने राजू शेट्टी नाव असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उतरवलं होतं. डमी राजू शेट्टीने स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची तब्बल 8 हजार मतं खाल्ली होती. आता पुन्हा एकदा राजू शेट्टी हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे धैर्यशील माने, सत्यजित पाटील यांच्यासारखंच राजू शेट्टींचाही डमी उमेदवार पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रायगड आणि हातकणंगलेच्या निवडणुकीत 'सेम टू सेम'वाला पॅटर्न कुणाच्या मतांचं गणित बिघडवणार हे पाहणं मह्त्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT