Hemant Godse meet chief minister Eknath shinde  saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: मुख्यमंत्री आणि गोडसेंचा एकाच कारने प्रवास; ठाणे ते दादरच्या प्रवासात काय झाली चर्चा?

Nashik loksabha Election : हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांनी एकाच कारने ठाणे ते दादर असा प्रवास केलाय. या प्रवासात या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रुपाली बडवे)

मुंबई: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये अजूनही तिढा कायम आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे हेमंत गोडसे हे देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत आहेत. (Latest News)

आज हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलीय. या भेटीत सीएम यांनी पुन्हा एकदा नाशिक लोकसभेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गोडसे आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी एकाच कारमधून ठाणे ते दादर असा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी काय चर्चा केली याची माहिती जरी गुलदस्ता असली तरी उमेदवारीविषयी त्यांची सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

या भेटीत नाशिकची सीट आपल्याकडेच राहील असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जात असल्याची चर्चा असल्याने हेमंत गोडसे आणि नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी नाराज होते. त्यांची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सीएमकडून होत आहे.

उमेदवारीवरून काय म्हणाले भुजबळ

अधिकृतरित्या जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचं भुजबळ म्हणालेत. ज्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर होईल, त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करणार. नाशिकची निवडणूक महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी तेथील वाटाघाटी झाल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT