n Pankja Munde Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha Election : यंदाचा निकाल ४ जून रोजी, यशश्री आपलीच; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics: पंकजा मुंडे यांनी आपल्या विजयावर विश्वास व्यक्त केलाय. विकास आणि निर्माण केलेला विश्वास हाच आपल्या निवडणुकीच्या मुद्दा असेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(विनोद जिरे, बीड)

Maharashtra Loksabha Election Pankja Munde :

आता आपला वनवास संपलाय. पाच वर्षे वनवास झाला मात्र आता तो संपणार आहे.यंदाचा निकाल हा ४ जून रोजी आहे, त्यामुळं यंदा यशश्री आपलीच आहे. मुंडे साहेबांचा राहिलेला सत्कार आपल्याला पूर्ण करायचाय, असा विश्वास बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर कीर्तन दर्शनासाठी जाण्याचा अधिकार सर्वांचा आहे, अशाप्रकारे कार अडवण्याने प्रॉब्लेम होतात, मग लोकांना शांत बसवणं मला देखील अवघड जाईल. असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ताफा अडवल्यानंतर केज येथील जाहीर भाषणातून दिला.(Latest News)

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की आता आपला वनवास संपणार आहे. यासाठी आपल्याला तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. माझ्या स्टेजवर सर्वांना माझे स्वागत करायचे आहे, मात्र स्टेजवर जागा कमी आहे. नाहीतर आपल्या वजनाने स्टेज पडेल. अन् याची बातमी होईल. मला माध्यमांनी विचारल, की मी कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. मी त्यांना नेहमी सांगत आले आहे की, मी कधी जाती पातीच राजकारण केलं नाही. मी या जिल्ह्यात कधीही जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं नाही. त्यामुळं मला वाटतं मी केलेला विकास आणि निर्माण केलेला विश्वास हाच माझा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा असेल.

मी आता तुकाराम महाराजांच्या बीजच्या कार्यक्रमाला गेले होते, तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलं आणि मी किर्तन अटेंड करायचं का नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली. माझा स्वभाव असा आहे, की माझ्यामुळे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. अगोदर ५ सहा लोक हातात काळा रुमाल घेऊन उभा होते. त्यानंतर बरेच लोक जमा झाले, घोषणा देत होते, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही.

कारण मला असं वाटत नाही, की हे मराठा आंदोलनातील लोक होते, ते जरांगे पाटलांच्या आंदोलनातील लोक होते, असं मला वाटत नाही. मला वाटतं यामागे राजकीय हाते असू शकतो, म्हणून मी त्याची माहिती घेते आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करायची कारण नाही.

या कीर्तनाला जायला कुठल्याही दर्शनाला जायला, सर्वांना अधिकार आहे. सर्वजण तिथे जाऊ शकतात. त्या ठिकाणी गोंधळ होऊ नये, अशा प्रकारची वागणूक सर्वांचीच असायला पाहिजे. त्यामुळं असय, की उद्या प्रॉब्लेम होऊन जातात, मग लोकांना शांत बसवणं मला देखील अवघड होईल. त्यांनी पण प्रचाराला जावा, सर्वांनी गुण्यागोविंदांनी राहावं, असं मला वाटतं. त्यामुळं सर्वांनी शांततेत विषय घ्या..त्यामुळं आता मुठच आवळ्याची आहे, प्रत्येक बोट बांधून मुठ आवळायची अन ४ जूनला त्याचा आवाज संसदेत झाला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT