Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया; महायुतीचा उल्लेख करत म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024 : भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला बच्चू कडू यांनी विरोध करत वनीत राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू असं व्यक्तव्य केलं होतं. त्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या निर्णयाला काही तास उलटत नाहीत तोच बच्चू कडू यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. बच्चू कडू कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता करेक्ट कार्यक्रम होईल, नवनीत राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला होता, त्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

पहिल्यांदा कमळावर निवडणूक अमरावती लढवणार आहे, त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद मानायला आलो होतो. अडसूळ व इतर अनुभवी आहेत. माझी त्यांना विनंती आहे की अमरावतीच्या विकासासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे. मी अमरावतीची सून आहे, सर्वांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद द्यावा. मेळघाट माहेर आणि अमरावती सासर आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते ज्यांचे सहयोगी आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलावं. आम्ही महायुतीला समर्थन दिलं, विरोधात असताना आम्ही भाजपसोबत होतो. आम्ही इतरांप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी गेलो नाही. मी त्यांच्या विधानावर काहीही बोलणार नाही. विकासाशिवाय काही नाही. अब की बार 400 पार मध्ये अमरावती असावी हेच माझं ध्येय्य आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले होते, दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेणार आहे. मी त्यांना (बच्चू कडू) आपल्या माध्यमातून विनंती करते, सर्वांनी अमरावतीच्या विकासासाठी सोबत यावं. मी त्या सर्वांपेक्षा लहान आहे, मी त्यांच्याकडून आशीर्वाद मागत असल्याचं त्या म्हणाल्या.

आम्ही महायुतीत मैत्रिपूर्व निवडणूक लढू. नवनीत राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू. महायुतीने सोबत ठेवलं नाही तर कोत्याक्षणी महायुतीतून बाहेर पडू, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.रवी राणा यांनी भाजपचं कार्यायल फोडलं होतं. त्याच रवी राणांच्या पत्नीचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे, ही लाचारी आहे. मला भाजपच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT