Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : राज्यात 60.22 टक्के मतदान; ५ ही मतदारसंघात शांततेत मतदान

Sandeep Gawade

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज 19 एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदानाची टक्केवारी:

रामटेक 58.50 टक्के,

नागपूर 53.71 टक्के,

भंडारा- गोंदिया 64.08 टक्के,

गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के

चंद्रपूर 60.03 टक्के.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या ८.४ कोटी तर महिला मतदारांची संख्या ८.२३ कोटी आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ३५.६७ लाख आहे. २० ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ३.५१ कोटी आहे. १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदान पार पडले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्ज, बारामती - ५१ उमेदवारांचे ६६ अर्ज, उस्मानाबाद - ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज, लातूर - ३६ उमेदवारांचे ५० अर्ज, सोलापूर - ४१ उमेदवारांचे ५३ अर्ज, माढा - ४२ उमेदवारांचे ५५ अर्ज, सांगली - ३० उमेदवारांचे ३९ अर्ज, सातारा - २४ उमेदवारांचे ३३ अर्ज, रत्नागिरी -सिंधुदुर्ग - ९ उमेदवारांचे १३ अर्ज, कोल्हापूर - २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज दाखल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT