Lok Sabha Election 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Maharashtra Lok Sabha 2024: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ जागांसाठी आज मतदान होईल. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे तीन टप्पे सुरळीत पार पडले. आता चौथ्या टप्प्यासाठी देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.

यापार्श्वभूमीवर कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व २५, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील ११, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४ जागांवर मतदान होईल.

याशिवाय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एका जागेसाठी मतदान होईल. निवडणुकीच्या या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. मतदारांचा कौल नेमका कुणाला असणार, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ जागांसाठी आज मतदान होईल. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कुणाकुणांमध्ये होणार लढत

  • पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजप) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)

  • बीड : पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनावणे (शरद गट)

  • शिरुर : अमोल कोल्हे(शरद गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव (अजित गट)

  • छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (शिंदे गट) चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) इम्तियाज जलील (एआयएमआयएम)

  • जालना : रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)

  • अहमदनगर : सुजय विखे-पाटील(भाजप) विरुद्ध नीलेश लंके (शरद गट)

  • मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे गट) संजोग वाघेरे (ठाकरे गट)

  • शिर्डी : सदाशिव लोखंडे ( शिंदे गट) भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)

  • रावेर : रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध श्रीराम पाटील (शरद गट)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT