Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

Maharashtra Politics 2024 : 'पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप', रवींद्र धंगेकर बसले आंदोलनाला; पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने सामने

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या एक दिवस आधी पुण्यातील सहकारनगर परिसरात भाजपाकडून मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. असा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस चौकीमध्ये ठिय्या मांडल्यानंतर राडा सुरू आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी सहकारनगर परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस चौकीमध्ये ठिय्या मांडला आहे. तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर राडा सुरू झाला आहे. जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार धंगेकर यांनी केला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आल्याची माहिती आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला घराघरात जाऊन पैसे वाटप करण्यात येत आहे. मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत चौकीतच ठिय्या मांडणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. यावेळी शरद पवार गटाचे नितीन कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर काढणार आणि त्याचा वापर पुण्याच्या निवडणुकीमध्ये करणार असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर कालपासून करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी रवींद्र धंगेकर यांनी आयोगाला पत्र लिहिलं होतं. या पत्रात पुणे मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत अशी मागणी केली होती.

Maharashtra Politics 2024
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पुन्हा लाव रे तो व्हिडिओ; सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

या चारही मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता ढाब्यावर बसवून झोपडपट्टी भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार या भागामध्ये जाऊन नागरिकांना धमकावत मतदान करू नये असं धमकावत आहेत. पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या मतदारसंघात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवावा. आचारसंहिता पथक कार्यरत ठेवावीत. या मतदारसंघांमध्ये प्रत्येक निवडणुकीत होणारी बेकायदेशीर मतदार वाहतूक हा पुणे लोकसभा मतदारसंघाचा दुर्दैवी इतिहास असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics 2024
Raj Thackeray: बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोवर विकास होणार नाही, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com