Satej Patil vs Hasan Mushrif  
लोकसभा २०२४

Maharashtra Election: कोल्हापुरात लाठीकाठीवरून राजकारण तापलं; पाटील आणि मुश्रीफांमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात लाठ्याकाठ्यांची एन्ट्री झालीये. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये लाठीकाठीवरून राजकारण तापलंय. कोल्हापूरच्या प्रचारात नेमकं काय घडतंय, पाहुयात या रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur Lok Sabha Elections Satej Patil vs Hasan Mushrif :

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय. लाठ्याकाठ्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री 12 वाजता काठी घेऊन उभा असेल, असा इशाराच काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी दिला होता. त्यावर हसन मुश्रीफांनी पलटवार करत, आम्ही पण 1 वाजेपर्यंत काठी घेऊन बसू असं म्हटलंय.

कोल्हापुरात मविआकडून छत्रपती शाहू महाराज विरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक मैदानात आहेत. महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची शनिवारी सभा आयोजित करण्यात आली आहे. 27 तारखेला तपोवन मैदानावर मोदींची अति विराट सभा होईल, असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.

कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी मविआसह महायुतीने कंबर कसली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचार शिगेला पोहोचलाय. कोल्हापूरचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा; ₹२००० आले की नाही?

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Maval : मावळच्या तिन्ही नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची सोडत; वडगाव नगराध्यक्ष महिला राखीव

Tudtuda Disease: भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगानं भातपीक फस्त....भातपीक नष्ट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त...|VIDEO

Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, पाहा EXCLUSIVE VIDEO

SCROLL FOR NEXT