Pm Modi and Amit Shah Saam tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Lok Sabha Election 2024: अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची चिंता चांगलीच वाढलीय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे भाजपला 400चा आकडा गाठणं अवघड होताना दिसतंय.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची चिंता चांगलीच वाढलीय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे भाजपला 400चा आकडा गाठणं अवघड होताना दिसतंय.

2024मध्ये मतदानात घट

2019 च्या निवडणुकीत भाजपने 37.36 टक्के मतदानासह 303 जागा जिंकल्या होत्या. तर संपूर्ण एनडीएला 44.87 टक्के मतांसह 352 जागा मिळाल्या होत्या. 2019च्या तुलनेत 400 चा आकडा पार करण्यासाठी अंदाजे 18 टक्के मतांची वाढ होणं अपेक्षित आहे. मात्र 2019 च्या तुलनेत यंदा पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे 3.44 टक्के आणि 2.74 टक्क्यांची घसरण झालीय.

म्हणूनच आता भाजपने आपल्या प्रचारासाठी नवा मास्टर प्लॅन आखलाय.आता निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराचे वेगळे मुद्दे असणार आहेत. आता भाजपकडून प्रचारासाठी 'सब का साथ, सब का विकास' ऐवजी हिंदू मुस्लीम विषयाला धरून सामाजिक तुष्टीकरणावर जोर दिला जाणार आहे. याशिवाय मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी भाजपने प्रचाराची नव्याने आखणी केलीय.

भाजपचा नवा गेम प्लॅन?

मतदान वाढविण्यासाठी भाजपने संघटना सक्रिय केल्या आहेत. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठया वाटण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आलीय.

दोन टप्प्यांमध्ये मतदान घटल्यामुळे भाजपची चिंता वाढलीय. आता पुढील टप्प्यांचा अंदाज घेत भाजप प्रचाराची रणनीतीत बदल करेल.. मात्र संघटनेच्या जोरावर तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT