congress flag Saam Tv
लोकसभा २०२४

Congress Candidate 7th List: काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांच्या नावाची ७वी यादी; आतापर्यंत १९४ जणांच्या नावांची घोषणा

Congress Declared 7th Candidate List For Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २६ मार्च २०२४ पर्यंत एकूण १९४ जागांसाठी उमेदवार जाहीर केलेत. २५ मार्च रोजी काँग्रेसने ६ वी यादी जाहीर केली होती.

Bharat Jadhav

Congress Releases 7th List Of Lok Sabha Candidates:

काँग्रेसने मंगळवारी रात्री लोकसभा निवडणूक २०२४ साठी सातवी यादी जाहीर केलीय.काँग्रेसने छत्तीसगडमधील ४ आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केलीय. छत्तीसगडच्या सुरगुजा (एसटी)मधून शशी सिंह, रायगड (एसटी)मधून डॉ. मै देवी सिंह, बिलासपूरमधून देवेंद्र सिंह यादव आणि कांकेर (एसटी)मधून बिरेश ठाकूर यांना संधी देण्यात आलीय. तर तामिळनाडूमधील मायलादुथुराई मतदारसंघातून आर सुधा यांना उमेदवारी देण्यात आलीय. (Latest News)

काँग्रेसने २५ मार्च २०२४ रोजी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली होती. यात राजस्थान आणि तामिळनाडूमधील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. या यादीत ४ उमेदवार राजस्थानमधील होते. (अजमेर - रामचंद्र चौधरी, राजसमंद - सुदर्शन रावत, भिलवाडा - डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटा - प्रल्हाद गुंजाळ) तर एक उमेदवार तामिळनाडू (तिरुनेलवेली - अधिवक्ता सी रॉबर्ट ब्रूसमधील) होता. राज्यातील काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आल्या जाहीर करण्यात आलंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान काँग्रेसच्या आधी भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. त्यात राजस्थानमधील लोकसभेच्या दोन आणि मणिपूरमधील एका उमेदवाराची नावे होती. राजस्थानमधील करौली-धोलपूरमधून विद्यमान खासदार मनोज राजोरिया यांचे तिकीट कापून इंदू देवी जाटव यांना उमेदवारी दिली.

तर दौसामधून मीना जसकौर यांचे तिकीट कापून कन्हैया लाल मीना यांना संधी देण्यात आलीय. त्याचबरोबर मणिपूरच्या इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांना डावलण्यात आलंय. त्यांच्या जागी थौनओजम बसंत कुमार सिंह यांना रिंगणात उतरवण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT