CM Eknath Shinde Saam TV
लोकसभा २०२४

CM Eknath Shinde: विरोधक मोदीद्वेषाने पीडित, त्यांच्या अहंकाराची लंका जनता जाळेल; एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य

Lok Sabha Election 2024: या सभेदरम्यान भाषणा करताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. '२०१४, २०१९ प्रमाणेच २०२४ मध्ये जनता विरोधकांना घरचा रस्ता दाखवतील.', असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसंच, 'प्रत्येक घराघरामध्ये नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये मोदी आहेत.', असे ते म्हणाले.

Priya More

CM Eknath Shinde On India Aghadi:

'विरोधक मोदी द्वेषाने पीडित. इंडिया आघाडीच्या अहंकाराची लंका जनता जाळेल.', असे वक्तव्य करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. रामटेक येथील महायुतीचे उमेदवार राजीव पारवे याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूरमध्ये सभा होत आहे. या सभेदरम्यान भाषणा करताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. '२०१४, २०१९ प्रमाणेच २०२४ मध्ये जनता विरोधकांना घरचा रस्ता दाखवतील.', असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसंच, 'प्रत्येक घराघरामध्ये नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये मोदी आहेत.', असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी रामटेक येथील सभेत भाषण करताना सांगितले की, 'प्रत्येक घराघरामध्ये नाही तर प्रत्येक मनामनामध्ये मोदी आहेत. विरोधकांचे जीवन फक्त घोटाळ्यामध्ये, भ्रष्टाचारामध्ये आणि रोकड मोजण्यात गेले. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी त्यांची अवस्था झाली आहे. विरोधक मोदीद्वेषाने पीडित आहेत. ते मोदींवर आरोप करतात पण मोदी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जरा पण त्यांची नजर त्यांच्याकडे गेली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडात फेस येईल. जेवढे विरोधक मोदींवर आरोप करतील त्यांना जनता घरी बसवतील.' अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली.

तसंच, '२०१४ मध्ये मोदींवर आरोप केले लोकांनी त्यांना घरी बसवले. २०२९ मध्ये देखील लोकांनी त्यांना घरी बसवले. आता विरोधकांना यावेळी देखील जनता घरचा रस्ता दाखवेल. देशातील १४० कोटी जनता मोदींसोबत आहे. एनडीएकडे आत्मविश्वास आहे. इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो. अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. इंडिया आघाडीच्या अहंकाराची लंका जनता जाळेल. त्यांचा अजेंडा भ्रष्टाचाराचा आहे. मोदींचा अजेंडा प्रगतीचा आहे.', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी देखील जनता विरोधकांना घरचा रस्ता दाखवतील असा टोला लगावला .

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'साप आणि मुंगूसाची मैत्री झाली हे जनतेला माहिती आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दाखवण्याचे काम मोदींनी केले. अन्न, वस्त्र, निवारा देणारे आमचे पंतप्रधान कुठे आणि भ्रष्टाचार-घोटाळे करणारे विरोधक कुठे. यावर्षी मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील. दलीत, आदिवसांच्या मतांचा काँग्रेसने फक्त फायदा करून घेतला.', असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT