Milind Deora: मिलिंद देवरा आणि अजित गोपछडे यांनी घेतली राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ

Milind Deora Took Oath As Rajyasabha MP: काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे नेते अजित गोपछडे यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली.
Milind Deora
Milind Deora

Milind Deora And Ajit Gopchade:

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) आणि भाजपचे नेते डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांनी आज राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आज मिलिंद देवरा आणि अजित गोपछडे यांना खासदार पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित गोपछडे यांनी हिंदीमधून तर मिलिंद देवरा यांनी मराठी भाषेमधून राज्यसभा खासदार पदाची शपथ घेतली.

काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे नेते अजित गोपछडे यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. यावेळी मिलिंद देवरा यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली तर गोपछडे यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली.

Milind Deora
PM Narendra Modi : जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल 370 अनेक दशकं कायम का राहिलं? PM नरेंद्र मोदींनी सांगितलं खरं कारण

मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर खासदार पदाची शपथ घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'पुन्हा एकदा खासदार म्हणून शपथ घेतल्याचा मला सन्मान वाटतो. यावेळी मी शिवसेना पक्षाचा राज्यसभेचा सदस्य असणार आहे. माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऋणी आहे. मुरलीभाईंचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि मुंबई, महाराष्ट्र आणि भारतासाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी पक्षाच्या पलीकडे काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.'

Milind Deora
CM Eknath Shinde: विरोधक मोदीद्वेषाने पीडित, त्यांच्या अहंकाराची लंका जनता जाळेल; एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य

मिलिंद देवरा काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत लिहिले होते की, 'आज माझ्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.'

Milind Deora
Rohit Pawar On Raj Thackeray: भाजपसोबत जाऊन आपली स्वायत्तता घालवली, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com