तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज (साेमवार) चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी हजेरी लावल्याचे चित्र आहे. महिनाभरात एकाच निवडणुकीत दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार हे मतदार घडविणार असल्याने त्याची चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला मतदान झाले. याच मतदारसंघातील मतदार आता तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी आलेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील साडेबारा गावे तेलंगणा सीमेला लागलेली आहेत. या गावांवर तेलंगणा आपला अधिकार सांगत आला आहे. पण ही गावे मूळ महाराष्ट्रात आहेत.
दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत. याचा फायदा घेत तेलंगणा सरकारने या लोकांना रेशन कार्ड, मतदान पत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
येथील लोकांना स्वतःचा फायदा दिसत असल्याने ते दोन्ही राज्यातील योजनांचा लाभ उचलत आहेत. स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत. मतदानसुद्धा ते दोन्ही राज्यात करतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत येथील लोक सहभाग घेतात. या साडेबारा गावात एकूण 5 हजार 117 मतदार आहेत. या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार आहे. आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी हजेरी लावली आहे.
सीमावर्ती साडेबारा गावे
येसापूर
अंतापूर
पद्मावती
इंदिरानगर
पलसगुडा
लेंडीगुडा
वेलापठार
नारायणगुडा
परमडोली
शंकरलोधी
महाराजगुडा
लेंडीजाडा
कोठा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.