Kalyan Thane Loksabha Election  Saam TV
लोकसभा २०२४

Kalyan Thane Loksabha Election : कल्याणसह ठाण्यामध्ये शिंदे गटाची मोठी मुंसडी; श्रीकांत शिंदे अन् नरेश म्हस्के आघाडीवर

Loksabha Election 2024 Results : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मोठी चूरशीची ठरलीये. कारण या दोन्ही मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली आहे.

Ruchika Jadhav

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज सर्वच जागांवरील कल येण्यास सुरुवात झाली आहे. अशात कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मोठी चुरशीची ठरलीये. कारण या दोन्ही मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली आहे. अशात सकाळपासून आलेल्या कलांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

कल्याण लोकसभा मतदासरंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत झाली. अशात वैशाली दरेकर या ६९,२२५ मतांनी पिछाडीवर आहेत.

तर श्रीकांत शिंदे ६९,२२५ मतांनी आघाडीवर असल्याचं दिसत आहे. सध्या आलेल्या कलांनुसार श्रीकांत शिंदेंना १,५१,०२३ मतं तर वैशाली दरेकरांना ६९,२२५ मतं मिळाल्याचं दिसत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे रिंगणात आहेत. येथे देखील राजन विचारे ६२,२४६ मतांनी पिछाडीवर आहेत.

तर नरेश म्हस्के ६२,२४६ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, नरेश म्हस्के यांच्या पारड्यात १,९४,४४९ मतं आहेत. तर राजन विचारेंना १,३२,२०३ मतं आहेत. आलेल्या कलांनुसार ठाण्यासह कल्याणमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

Maharashtra Live News Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू

Shirdi Politics : ४ वर्षांपासून प्रचार, ऐनवेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण SCसाठी जाहीर; साईबाबांच्या शिर्डीत दिग्गजांचा हिरमोड

हार्दिक पांड्याने खरेदी केली Lamborghini, किंमत वाचून व्हाल थक्क; पाहा photos

SCROLL FOR NEXT