Lok Sabha Results Bengal Bomb Blast: लोकसभेच्या निकालापूर्वी पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; ५ जण गंभीर जखमी, परिसरात खळबळ

West Bengal News: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमधील जाधवपूरमध्ये स्फोट झाला आहे.
West Bengal News
Lok Sabha Results Bengal Bomb BlastSaam Tv

पश्चिम बंगालमधील जाधवपूरमध्ये मतमोजणीपूर्वी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भांगुडच्या ब्लॉक २, उत्तर काशीपूर, चालताबेरिया येथे झालेल्या स्फोटात आयएसएफच्या पंचायत सदस्यासह ५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

West Bengal News
Accidnet News: दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू, सोयगाव तालुक्यात भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री (3 जून) रोजी कोसीपोर पोलीस स्टेशनच्या परिसरात चालताबेरिया येथे हा बॉम्बस्फोट झाला. या ठिकाणी अवैध(illegal) बॉम्ब बनविण्याचे काम सुरु असल्याचे समजते. झालेल्या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीमध्ये एका पंचायत नेत्याचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब बनवताना हा मोठा स्फोट झाल्याचे बंगाल पोलिसांनी सांगितले. सध्या सर्व जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त(security) करण्यात आलेला आहे. घटनास्थळी सुरु असलेल्या या अवैध कामाबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

West Bengal News
Madhya Pradesh Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून १३ जण जागीच ठार, अनेक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com