Amritpal Singh Engineer Rashid Won From Jailed Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात; लोकसभा निवडणुकीत दोन उमेदवारांनी मिळवला दणक्यात विजय; आता पुढे काय?

Amritpal Singh Engineer Rashid Won From Jailed:लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत तुरुंगात असलेले दोन उमेदवार विजयी झाले आहेत. आता त्यांना शपथ घेता येणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Rohini Gudaghe

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले होते. या निवडणुकीत दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडून आले आहेत. पंजाबच्या खदूर साहिबमधून लोकसभा मतदारसंघामधून अमृतपाल सिंग या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत, तर जम्मू-काश्मीर खोऱ्यात लांगेट मतदारसंघातून अब्दुल रशीद शेख निवडून आले आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल समोर आले आहेत. दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार (Lok Sabha Election 2024 Results) निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल का? ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का? असे प्रश्न समोर येत आहेत. कायद्यानुसार त्यांना नवीन सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नसली तरी त्यांना खासदार म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) यांनी पंजाबच्या खदूर साहिब जागेवर विजय मिळवला आहे. तर दहशतवादासाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेला अब्दुल रशीद शेख विजयी झाले आहेत. अब्दुल रशीद शेख (Rashid Sheikh) दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहेत. अमृतपाल सिंगला एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती, त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता प्रश्न असा पडतोय की, तुरुंगात असलेल्या या निवडून आलेल्या खासदारांना शपथ घेता येणार का?

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तुरुंगात असलेल्या खासदारांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची प्रक्रिया काय असते? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. कायदेशीररित्या, अमृतपाल सिंग आणि अब्दुल रशीद शेख यांना १८ व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे, तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे, असं पीटीआयच्या अहवालात म्हटलं असल्याची माहिती इंडिया टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत (Lok Sabha Election 2024) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण-प्रसारणास मनाई! पुणे प्रशासनाचे आदेश, पालन न केल्यास होणार शिक्षा

Maharashtra Live News Update: हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Ulhasnagar News : धक्कादायक! उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन

Maharashtra Politics: फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे शिंदे? जरांगेंशी वाटाघाटीतून शिंदे दूर?

SCROLL FOR NEXT