Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : या उमेदवारांना ३ वेळा द्यावी लागणार वृत्तपत्रात माहिती; काळ्या पैशावरही असणार नजर

Lok Sabha Election 2024 Code Of Conduct : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जूनला निकाल लागणार आहे. ५ लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला 3 वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल. त्या पक्षाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे.

निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीतील आव्हानंही स्पष्ट केली. त्यामुळे गुन्हेगाही, पैसा, चुकीची माहिती, आचारसंहितेचा भंग समावेश आहे. ब्लॅक मनीचा मोठी समस्या आहे. मागच्या ११ विधानसभा निवडणुकांमध्ये ३४०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत याला रोखनं मोठं आव्हान प्रशासन आणि यंत्रणांवर असणार आहे. या ११ राज्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या रोकडीचं प्रमाण पाच वर्षापूर्वीपेक्षा ८०० टक्क्यांनी वाढल्यांच समोर आलं आहे. त्यामुळे बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूं वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

४७.१ कोटी महिला मतदार

एकूण मतदारांमध्ये ४९.७ कोटी पुरुष, ४७.१ कोटी महिला आणि ४८ हजार ट्रान्सजेंडर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आमच्या मतदार यादीत ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८२ लाख आणि १०० वर्षांवरील २.१८ लाख मतदारांचा समावेश आहे."

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ''१७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT