Deepak Kesarkar On Narayan Rane
Deepak Kesarkar On Narayan Rane Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाही, मात्र नारायण राणेंनी ते शक्य करून दाखवलं: दीपक केसरकर

साम टिव्ही ब्युरो

Deepak Kesarkar On Narayan Rane:

>> विनायक वंजारे

''कोकणात ज्या ज्या नेत्यांची सत्ता येते, त्या त्या नेत्यांना मंत्रिपद मिळतात. नारायण राणे यांना कोकणातील प्रतिनिधी म्हणून दिल्लीत मनाचे स्थान मिळाले आहे. मात्र आमच्या खासदारांना (विनायक राऊत) कोणी ओळखत नाही, ते प्रती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात वावरत होते'', अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे. सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना जाते असं म्हणाले आहेत.

कोकणात जे खासदार म्हणून निवडून येतात, ते केंद्रात मंत्री होतात. नारायण राणे निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री होतील. राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखला जातो, नारायण राणे यांची कोकणचा नेता म्हणून प्रतीमा आहे, अशी स्तुती सुमने दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर उधळली.

ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाहीत. मात्र नारायण राणे यांनी स्वतः सह ११ आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले. यातून राणेंनी कोकणावर आणि महाराष्ट्रावर किती पकड आहे हे दाखवून दिलं.

शरद पवार यांना लक्ष्य करत दीपक केसरकर म्हणाले, ''२०१४ मध्ये मागितलं नसताना देखील सरकारला शरद पवारांनी पाठिंबा दिला आणि शिवसेनेची ताकद संपवली. २०१७ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची बोलणी केली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली तरी चालले, मात्र शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये राहील, असं सांगितलं. मात्र शरद पवारांनी शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, इतका द्वेष ते शिवसेनेचे करत होते. चार चार वेळा शरद पवार यांनी शिवसेना फोडली.''

२०१९ ला काठावर सरकार आलं. तेव्हा राज्यांत राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवारांचा हात होता, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. तर एक प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय दुसरा प्रादेशिक पक्ष वाढत नाही, हे समीकरण शरद पवारांनी महाराष्ट्रात राबवलं. मात्र उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करतात हे योग्य नाही, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT