Ujjwal Nikam Vs Varsha Gaikwad From Mumbai North Central Lok Sabha Election 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Mumbai North Central Lok Sabha: एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला?

Satish Kengar

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ. या जागेवर गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या. मात्र यंदा त्यांचं तिकीट कापून पक्षाने येथून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने येथून वर्षा गायकवाड यांचा तिकीट दिलं आहे.

वर्षा गायकवाड बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५१.९८ टक्के मतदान झालं. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. याआधी एक्झिट पोलमधून भाजपला धक्का बसला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड आघाडीवर आहे, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर उज्ज्वल निकम हे पिझाडीवर आहेत, असा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आला आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभेचा भूगोल

मुंबई उत्तर मध्य लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

येथून २०१४ ला भाजपने दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या विद्यमान खासदार २ लाख ९१ हजार ७६४ मतं मिळाली होती. तब्बल १ लाख ८६ हजार ७७१ मतांनी महाजन यांनी दत्त याचा पराभव केला. तसेच २०१९ साली भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार बदलले नाही. या वेळी महाजन यांना ४ लाख ८६ हजार ६७२ मतं मिळाली आणि त्या विजयी झाल्या.

कुणाचे किती आमदार?

2019 मध्ये मुंबई उत्तर मध्यच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन, शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता. २०१४ मध्ये हीच आकडेवारी होती. वांद्रे पुर्वमध्ये २०१४ ला शिवसेनेचा आमदार होता तिथे २०१९ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर चांदिवली मतदारसंघात २०१४ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता, २०१९ ला तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकला.

२०१४ आणि २०१९नंतर आता २०२४मध्ये काय चित्र आहे?

मुंबई उत्तर मध्यमधील सहापैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. त्यापैकी दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात गेलेत. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे पारडे जड झाले आहे.कालिनाचे आमदार संयज पोतनीस हे ठाकरे गटात राहिलेत. पण वांद्रे पुर्वचे आमदार झीशान सिद्दीकी यांचे वडील आणि माजी खासदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश घेतलाय.

दरम्यान, भाजप येथे सलग दोन वेळा निवडून आली असली तरी काँग्रेसनेही यावेळी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यातच एक्झिट पोलमध्ये वर्षा गायकवाड यांचा विजय होऊ शकतो, असा अंदाज समोर आल्याने भाजप आणि उज्ज्वल निकम यांचं टेन्शन वाढलं आहे. मात्र खरा निकाल हा ४ जून रोजीच समजणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT