बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेते अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रिंगणात उतरले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये (Kalyan Lok Sabha Election) ते निवडणूक लढणार आहेत. आज ते आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशामध्ये आता अभिजीत बिचुकले विरूद्ध श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अभिजीत बिचुकले यांनी श्रीकांत शिंदेविरोधात जोरदार निशाणा साधला.
कल्याण लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दोन वेळा निवडून आलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे . याच मतदारसंघातून आता बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत . अभिजीत बिचुकले यांनी याआधी सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
अभिजीत बिचुकलेंनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात मी निवडणूक लढवली होती. तेव्हा संपूर्ण शिवसेना एक होती. त्यावेळचे विकासाचे मुद्दे होते. पण आता गेली अडीच वर्षे तुम्ही पाहत असाल तर जनतेच्या प्रश्नांशी या लोकांना काहीच घेणेदेणे राहिले नाही. हे फक्त स्वार्थी राजकारण करत आहेत.', असा आरोप त्यांन केला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडण्यामागचे कारण अभिजीत बिचुकले यांनी सांगितले आहे. 'मी कोणत्याही पक्षात काम करत नाही. हा लोकसभा मतदारसंघ निवडण्यामागचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे साताऱ्याचे आहेत. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. खूप कौतुक वाटते मला. पण ज्यापद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं आणि ज्या पद्धतीने ते आता राजकारण करत आहेत. तर ते जनतेला फसवत आहेत असे माझे ठाम मत आहे.'
बिचुकले यांनी यावेळी एकनाथ शिंदेंवर टीका देखील केली, 'एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांचे ते स्वप्न होते आणि ते झाले. शिवसेनेला त्यांनी काबीज केले. शिवसेना त्यांनी उद्धवस्त केली. पण त्यांचे विधान असे होते की, अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास मी इंटसेस्टेड नाही. म्हणून मी हे सगळं केलं. कारण उद्धव ठाकरे हे अजित पवारांसोबत आहेत. त्या अनुषंगाने ते भाजपसोबत गेले. ज्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे नाही असे म्हणणारे एकनाथ शिंदेंनी त्याच अजित पवारांना मांडीवर घेतलंय. हे सरकार पूर्णपणे लोकांना खेळवत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.