Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

Lok Sabha Election 2024: राहुल गांधींना अमेठीत पराभव दिसत होता. म्हणूनच त्यांनी रायबरेलीत पळ काढला. डरो मत, भागो मत, असं म्हणत मोदींनी जोरदार टोला हाणला. ते पश्चिम बंगाल येथील जाहीर सभेत बोलत होते.
PM Narendra Modi on Rahul Gandhi
PM Narendra Modi on Rahul GandhiSaam TV

PM Narendra Modi on Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यंदा रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवली होती. यंदाही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा होती. पण काँग्रेसने ऐनवेळी या जागेवरून केएल शर्मा यांना उमेदवारी दिली. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला हाणला आहे.

PM Narendra Modi on Rahul Gandhi
Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

"मी आधीच सांगितलं होतं, की राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतून निवडणूक लढवणार नाही. कारण, त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत होता. म्हणूनच त्यांनी अमेठी सोडून रायबरेलीत पळ काढला. डरो मत, भागो मत, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला. ते पश्चिम बंगाल येथील जाहीर सभेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली. या सभेतून नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

"राहुल गांधींना अमेठीतून निवडणूक लढवण्याची भीती वाटत होती. त्यामुळे ते रायबरेलीत पळण्याचा मार्ग शोधत होते. अखेर त्यांनी पळ काढलाच. पण मी राहुल गांधींना सांगतो की तुम्ही घाबरू नका, पळून जाऊ नका.", असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

मोदी म्हणाले, "गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यावेळी खूपच कमी जागा मिळणार आहेत. त्यामुळे पराभवाच्या भीतीने ते पळ काढत आहेत. आता देशाला देखील समजू लागले आहे की हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी लढत नाहीत, ते फक्त देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत".

"मी मौजमजा करण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मला स्वत:साठी जगायचे नाही. भारत मातेच्या १४० कोटी देशवासियांची सेवा करण्याची मी शपथ घेतली आहे. विकसित भारत बनवण्यासाठी, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहेत", असंही मोदींनी म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com