India Aaghadi Press Conference Updates: Saamtv
लोकसभा २०२४

India Aaghadi Press Confenrece: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला मोठा आकडा!

India Aaghadi Press Conference Updates: या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई, ता. १८ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

"महाराष्ट्रातील सरकार धोका आणि कट रचून बनवलं गेले. पंतप्रधान अशा राजकारणाचे समर्थन करतात. पंतप्रधान रॅलींमधूनही समाजाला तोडण्याच्या गोष्टी करतात. पंतप्रधान मोदींचे फोडाफोडीचे राजकारण कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, सर्वत्र सुरू आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी जवळपास ४६ जागा मिळतील, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

"मोदी सरकार धमकी आणि आमिष दाखवून विरोधी पक्षाला फोडत आहे. मूळ पक्षाचे चिन्ह हिरावून घेतलं जात आहे आणि बंडखोरांना दिलं जात आहे. हे सगळं मोदींच्या इशाऱ्यावर होतेय. पण यंदा निवडणुकीत हे होणार नाही. यंदाची निवडणूक जनता लढते आहे. लोक यांच्यावर नाराज आहेत," असेही मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.

"मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे .मात्र मोदी आल्यानंतर त्यांनी मुंबईकडे दुर्लक्ष केलं. आमचं सरकार आल्यावर आम्ही GST काढून एक सरळ GST लागू करू ज्याचा फायदा सगळ्यांचा होईल. नेहमी आम्हाला मोदी देशद्रोही बनवतात आणि स्वतः ला देशभक्त संबोधतात, अशी टीकाही मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT