Mumbai News: मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक

Mumbai Crime News: नोकरीच्या शोधात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक समोर आली आहे. मुंबईच्या वरळी परिसरात ही घटना घडली आहे.
मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक
Mumbai Crime NewsSaam TV

नोकरीच्या शोधात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक समोर आली आहे. मुंबईच्या वरळी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक
Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

जोसेफ झेवियर (वय ५०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दिघा गावातील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून ती नोकरीच्या शोधात होती. तुला नोकरी मिळवून देतो असं आश्वासन पीडितेला तिच्या मित्राने दिलं होतं.

गुरुवारी (ता. १६) पीडित तरुणीच्या मित्राने तिला खार येथे बोलावून घेतलं. तिथे पीडितेची ओळख आरोपी जोसेफ याच्यासोबत करून दिली. जोसेफने मद्यपान केलं होतं. रात्री १० वाजता आरोपी जोसेफने पीडित तरुणीला घरी सोडवून देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं.

त्यानंतर कार वरळी येथील प्रसिद्ध अभ्यास गल्लीत नेली. तिथे अंधाराचा फायदा घेऊन आरोपी जोसेफ याने कारमध्येच तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला एका टॅक्सीमध्ये बसवून दिलं.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित तरुणी प्रचंड घाबरली. तिने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी जोसेफ याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक
Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com