Lok Sabha Election 2024 Saam tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: '...तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू', लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Beed News: देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यातच देशात सात टप्यात तर राज्यात पाच टप्यात निवडणूक पार पडणार आहे. यातच बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

विनोद जिरे

Lok Sabha Election 2024:

देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यातच देशात सात टप्यात तर राज्यात पाच टप्यात निवडणूक पार पडणार आहे. यातच बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील जे संवेदनशील गाव आणि बूथ आहेत, त्या गावात जाऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे बैठक घेऊन आढावा घेत आहेत.

बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान फेव्हीस्टिक टाकून ईव्हीएम मशीन खराब करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यात आली. यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये बैठक घेत आढावा घेतला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

''जर लोकशाहीला मारक अशा घटना घडल्या तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल'', असा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आढावा बैठकीतून दिला आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्याचे २० मे रोजी, सहाव्या टप्प्याचे २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे.

तसेच राज्यात पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल. तिसरा टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होईल. तर पाचवा टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

SCROLL FOR NEXT