Pm Modi Interview Saam Tv
लोकसभा २०२४

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pm Modi Interview: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस सातत्याने आरोप करत आहे की, मोदी सरकार निवडणूक जिंकण्यासाठी ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pm Modi Interview:

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस सातत्याने आरोप करत आहे की, मोदी सरकार निवडणूक जिंकण्यासाठी ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहे. यावरच आता न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी ईडी, सीबीआय आणि ईव्हीएमवर विरोधकांच्या आरोपांना उघडपणे उत्तर दिले आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''2014 आधी सीबीआय आणि ईडी त्यांच्या हातातील बाहुले होते, मग ते निवडणुका कसे हरले.'' ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची भीतीही मोदी यांनी निराधार असल्याचे सांगून एवढ्या मोठ्या देशात महापालिका निवडणूकही निश्चित होऊ शकत नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, विरोधक जगाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, "2014 मध्ये त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय होती, मग ते का हरले? त्यांनी माझ्या गृहमंत्री (तेव्हा अमित शाह गुजरातचे गृहमंत्री होते) तुरुंगात टाकले. तरी ते का हरले? ईडी -सीबीआयचा वापर करून निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर त्यांनी सर्व निवडणुका जिंकल्या असत्या.''

ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून हे लोक इतके निराश झाले आहेत की, ते बहाणे शोधत आहेत. कारण पराभवानंतरही त्यांना लोकांसमोर जावे लागते. त्यामुळे मला वाटते की कदाचित ते हे सर्व बहाणे आधीच शोधत असतील. कदाचित त्यांच्या अंतर्गत रणनीतीचा भाग आहे."

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली आणि त्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव असल्याचे सांगितले. संपत्तीच्या पुनर्वितरणाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कल्पना शहरी नक्षलची विचारसरणी असल्याचे ते म्हणाले. मोदी म्हणाले, “एक्स-रे म्हणजे प्रत्येक घरावर छापा टाकणे. जर एखाद्या महिलेने मोठ्या धान्याच्या डब्यात सोने लपवले असेल, तर त्याचा एक्स-रे केला जाईल. त्या महिलांचे दागिने जप्त करण्यात येतील. जमीन व मालमत्तेची कागदपत्रे तपासून या सर्व मालमत्तांचे पुनर्वितरण केले जाणार आहे. अशा माओवादी विचारसरणीने जगाला कधीही मदत केलेली नाही. ही पूर्णपणे शहरी नक्षलची विचारसरणी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Internship Scheme: खुशखबर! तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?

Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

Maharashtra News Live Update: ऐन लग्नसराईच्या काळात अमरावतीत फुलांचे दर घसरल

Gold Rate Today: युद्ध थांबताच सोन्यानं उच्चांक गाठला, सोनं ३९,८०० रुपयांनी महागलं; २४ अन् २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT