Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Surabhi Jayashree Jagdish

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब सातत्याने सामान्यपेक्षा जास्त असतो. रक्तदाब मोजताना वरचा आकडा आणि खालचा आकडा असे दोन आकडे नोंदवले जातात. एकाच वेळी आलेल्या एका रीडिंगवर निष्कर्ष न काढता योग्य पद्धतीने केलेल्या वारंवार मोजमापांचा विचार केला जातो.

High blood pressure | saam tv

सकाळी उठल्यानंतर BP वाढणं

सकाळच्या वेळी उठल्यावर काही हार्मोन्स आणि शरीरातील नैसर्गिक सक्रियता वाढल्यामुळे रक्तदाबात तात्पुरती वाढ होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये ही वाढ अधिक जाणवू शकते. सकाळचा BP वारंवार वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Blood pressure causes | saam tv

काय दिसतात लक्षणं?

उच्च रक्तदाबाला अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात म्हणून त्याला ‘सायलेंट किलर’ असंही म्हटलं जातं. BP खूप वाढल्यास डोकेदुखी, चक्कर येणं, धाप लागणं, छातीत अस्वस्थता किंवा दृष्टी धूसर होणं अशी लक्षणं काही लोकांमध्ये दिसू शकतात. तीव्र छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, अचानक अशक्तपणा किंवा बोलण्यात अडचण अशी गंभीर लक्षणं आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

High BP symptoms | saam tv

झोपेची कमतरता

पुरेशी आणि नियमित झोप न मिळाल्यास शरीरातील ताणाशी संबंधित हार्मोन्स आणि मज्जासंस्थेची एक्टिव्हीटी वाढू शकते. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Morning hypertension causes | saam tv

जास्त मीठ

आहारातून जास्त प्रमाणात सोडियम म्हणजेच मीठ घेतल्याने शरीरात द्रव साचण्यास आणि रक्तदाब वाढू शकतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स, लोणची आणि जास्त मीठ असलेले पदार्थ यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असू शकतं.

Why BP rises in morning | saam tv

ताणतणाव

मानसिक ताण, चिंता आणि सततचा तणाव यामुळे काही काळासाठी रक्तदाब वाढू शकतो. नियमित व्यायामाचा अभाव, जास्त वेळ बसून राहणं आणि अयोग्य जीवनशैलीमुळे दीर्घकाळ रक्तदाब नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं.

Smoking and blood pressure | saam tv

कॅफेन आणि तंबाखू

चहा-कॉफीमधील कॅफेन काही व्यक्तींमध्ये थोड्या काळासाठी रक्तदाब वाढवू शकतो. धूम्रपान आणि तंबाखूतील निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात आणि रक्तदाब तसंच हृदयावरील ताण वाढू शकतो.

Hypertension risk factors | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hypertension awareness | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Toned milk | saam tv
येते क्लिक करा