Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Maratha Reservation: बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज माजलगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना लवूळ येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरे जावे लागले.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam Tv

Pankaja Munde News:

बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज माजलगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना लवूळ येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट गाडी खाली उतरून या आंदोलकांशी संवाद साधला.

तुमची काय मागणी आहे, ती मला सांगा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं. नंतर या आंदोलकांनी ताई आमचा तुमच्यावर रोष नाही. परंतु मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या, आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही आम्हाला लेखी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी तुमचा आवाज तुमच्या प्रश्नावर मी नक्कीच आवाज उठविल, असे आश्वासन दिले. यावेळी बराच वेळ आंदोलक व पंकजा मुंडे यांचा संवाद सुरू होता.

Pankaja Munde
Pm Modi In Satara: मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, पंकजा मुंडे आज बीडच्या माजलगाव तालुक्यातील गावखेड्यात दौऱ्यावर आहेत. त्या आज माजलगावच्या जवळ गावात गेल्यानंतर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेचा ताफा येताच घोषणाबाजी केली होती. तर त्यानंतर किट्टी आडगावमध्ये देखील एकीकडे पंकजा मुंडे यांची सभा सुरू असताना दुसरीकडे मात्र मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, असं म्हणत घोषणाबाजी केली.

Pankaja Munde
Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

यातच मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी विरोध दर्शवला, त्यांना पाडा असं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मात्र बीडच्या गावखेड्यामध्ये मराठा आंदोलकांच्या घोषणांचा सामना करण्याची वेळ आल्याचे दिसतय. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधत समजूत काढली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com