तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक
दिंडोरी लोकसभा मतदार संघात (Dindori Lok Sabha 2024) महायुतीला मोठा धक्का बसला का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. कारण शरद पवार गटाच्या बैठकीत नरहरी झिरवळ असलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबतं सुरू असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसून आले आहेत. तसा फोटो समोर आला आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ दिंडोरीचे महाविकास आघाडीचे (Narhari Zirwal In Bhaskar Bhagare Sabha) उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीत उपस्थित असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कारण नरहरी झिरवळ यांचा प्रचार बैठकीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात नेमकी कोणती खलबतं सुरू आहेत, याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे. दिंडोरी लोकसभा मतदासंघात भाजप खासदार भारती पवार अन् शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात थेट लढत होत असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु आज भास्कर भगरे यांच्य बैठकीत नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदार संघात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या बैठकीत नरहरी झिरवळ दिसत आहेत. त्यासोबत इतर काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत बैठकीत दिसत आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे दिंडोरीत दोन्ही पक्षांचा प्रचार चांगलाच रंगला आहे. आता महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत नरहरी झिरवळ असल्याचा फोटो समोर आलाय. परंतु याबाबत अजून नरहरी झिरवळ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.