तबरेज शेख, नाशिक|ता. ९ मे २०२४
राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. येत्या २० मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. एकीकडे राज्यभरात प्रचाराचा धुरळा सुरू असतानाच महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपल्याचे समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ युतीधर्म पाळत नसल्याची टीका करत गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता छगन भुजबळ यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
मनमाड नांदगाव लोकसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी काल छगन भुजबळ यांच्यावर तुतारीला मदत केल्याचे गंभीर आरोप केले होते. सुहास कांदे यांच्या आरोपांवर आज छगन भुजबळ यांनी जोरदार पलटवार केला असून सुहास कांदे यांना गांभीर्याने घेण्याची काय आवक आवश्यकता घेण्याची गरज काय? असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
तसेच "मला मोठे आश्चर्य असं वाटतं की तुम्ही सुहास कांदेला तो जरी आमदार असला तरी त्याला एवढा गांभीर्याने घेण्याची काय गरज आहे. तो काय प्रवृत्तीचा मनुष्य आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे. या आधी वीस पंचवीस दिवसापासून भारती पवार यांच्या कामाला मी सुरुवात केली. कोण काय बोलतो कोण काय बोलतो यासाठी आपल्याला वेळ नाही आपल्याला उमेदवारांना निवडून पाठवायचा आहे," असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते सुहास कांदे?
छगन भुजबळ हे महायुतीचा धर्म न पाळता तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी लावला होता. महायुतीकडून मंत्रीपद घ्यायचे आणि प्रचार, प्रसार मात्र महायुतीचा धर्म न पाळता करायचा. यापेक्षा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन खुशाल तुतारीचा प्रचार करावा.. असा टोला सुहास कांदे यांनी लगावला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.