धरणगाव (जळगाव) : गावांमध्ये भांड्यांना पॉलिश करून देणारे फिरत असतात. असेच धरणगावमध्ये (Dharangaon) आलेल्या दोघांनी तांबे व पितळाचे भांडे पॉलिश करून देण्याचे महिलांना सांगितले. महिलांनी हे काम दिल्यानंतर त्यांची नजर चुकवत दागिने घेऊन दोघे पसार झाल्याची घटना धरणगावमध्ये घडली आहे.
धरणगाव शहरात दोन महिलांना गंडवल्याचा प्रकार ८ मे रोजी उघडकीस आला. धरणगावातील जळगाव (Jalgaon) रस्त्या लगतच्या मातोश्री नगर परिसरात दोनजण मोटारसायकलवरून आले. त्यांनी परिसरात भांडे चमकून देण्याचे माहिती देत फिरले. या दरम्यान स्वाती रामदास रोकडे आणि इंदूबाई हरी सोनवणे या दोन महिलांना तांबे- पितळाचे भांडी व चांदी- सोन्याचे (Gold) दागिने चमकून देतो, असे सांगत विश्वासात घेतले. यावर विश्वास ठेवून स्वाती रोकडे व इंदुबाई सोनवणे यांनी घरातून दागिने पॉलिश करण्यासाठी आणले.
यात स्वाती रोकडे यांच्याकडून १६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व इंदूबाई सोनवणे यांच्याकडून १६ हजार किमतीचे कानातील सोन्याचे कर्णफुले तसेच २४ हजाराचे गळ्यातील सोन्याची पोत असा एकूण ५६ हजाराचा ऐवज चमकून देण्यासाठी घेतले. त्यानंतर हात चलाखी करत दागिने परत न देता घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी स्वाती रामदास रोकडे यांच्या फिर्यादीवरून (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.