Nashik News : ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख घेतले; सुटीवर असताना महिला अधिकाऱ्याने लाच घेतल्यानं गुन्हा

Nashik News : रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक पदावर असलेली महिला अधिकारी प्रसूतीच्या (Nashik) सुटीवर असताना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी (Bribe) केली. तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारल्याने नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nashik News
Fraud Case : परदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने १० लाखात फसवणूक

नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक आरती आळे असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सरकार वाड्यामध्ये कार्यरत आहेत. आरती आळे मागील १०- १२ दिवसांपासून प्रसुती रजेवर आहेत. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारण्यात आली होती. 

Nashik News
Jalna Crime : मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव; बापाच्या कृत्याने सारे हादरले, तपासात सत्य आले समोर

सदरची रक्कम स्वीकारणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे आणि तेजस गर्गे या दोघांच्या विरोधात लाचेचा गुन्हा इंदिरानगर पोलीस (Police) ठाण्यात दाखल झाला. विशेष म्हणजे राज्यातील पुरातत्त्व विभागाचा संचालक तेजस गर्गे सुद्धा आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. लाच दिल्याशिवाय काम होत नाही असे शासकीय कार्यालयांमध्ये एकही खाते शिल्लक राहिलेले नाही हे यामुळे सिद्ध होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com