Hemant Godse Meet Chhagan Bhujbal
Hemant Godse Meet Chhagan BhujbalYandex

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये मोठी घडामोड; हेमंत गोडसेंच्या प्रचारात छगन भुजबळ सहभागी होणार का? स्वत:च सांगितलं

Hemant Godse Meet Chhagan Bhujbal: पाचव्या टप्प्यात नाशिकमध्ये मतदान होणार आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी घडामोड घडत असल्याचं पाहायला मिळतंय.

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

पाचव्या टप्प्यात नाशिकमध्ये मतदान (Nashik Lok Sabha) होणार आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी घडामोड घडत असल्याचं पाहायला मिळतंय. कित्येक दिवस महायुतीचा तिढा सुटत नव्हता. अखेर १ मे रोजी महायुतीने आपला उमेदवार जाहीर झाला. महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फॉर्मवर गोडसे यांनी भुजबळांची भेट घेतली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे प्रथमच भुजबळ फॉर्मवर (Nashik Election) गेले आहेत. याआधी १ मे रोजी नाशिकमधून गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर मंत्री दादा भुसे आणि अजय बोरस्ते यांनी भुजबळ फॉर्मवर जावून भुजबळांसोबत चर्चा केली होती. नाशिकमध्ये २ मे रोजी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शन रॅलीत भुजबळ सहभागी झाले होते. मात्र, प्रचारात काहीसे एकाकी पडत असल्यानं गोडसे भुजबळांची भेट घेवून प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

महायुतीचे भुजबळ साहेब जेष्ठ नेते आहेत. महायुतीच्या सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनंती केली असल्याचं हेमंत गोडसे यांनी माध्यमांना सांगितलं (Hemant Godse Meet Chhagan Bhujbal) आहे. भुजबळ साहेब सहभागी झाल्यामुळे मोठी ताकद महायुतीला मिळाली आहे. त्यांच्यामुळे विजय निश्चितपणे सोपा झाला असल्याचं गोडसेंनी म्हटलं आहे.

Hemant Godse Meet Chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha: नाशिक जिल्ह्यातील'या' दिग्गज उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

राष्ट्रवादी शंभर टक्के हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणू, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांच्या भाकितावर प्रतिक्रिया (Maharashtra Election) देत भुजबळ म्हणाले की, प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही. नाशिकमध्ये आता महायुतीचा प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Hemant Godse Meet Chhagan Bhujbal
Nashik Loksabha : फक्त १ मिनिट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार; अनिल जाधवांमुळे नेते-कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com