Vijaykumar Gavit Saam Tv
लोकसभा २०२४

Vijaykumar Gavit: मोदींनी आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो, राज्यातील भाजप मंत्र्याचं वक्तव्य

Vijaykumar Gavit On BJP Government Schemes: शिरपूर येथील नमो संवाद मेळावादरम्यान मंत्री विजयकुमार गावित यांनी भाषणादरम्यान हे अजब विधान केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो.', असे विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे.

Priya More

Dhule Namo Samvad:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री विजयकुमार गावित (Minister Vijay Kumar Gavit) यांनी केले आहे. शिरपूर येथील नमो संवाद (Namo Samvad) मेळावादरम्यान मंत्री विजयकुमार गावित यांनी भाषणादरम्यान हे अजब विधान केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो.', असे विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे.

आज धुळ्यातील शिरपूर येथे नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार हिना गावित (Hina Gavit) यांच्या प्रचारार्थ नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब वक्तव्य करत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.

गावित यांनी यावेळी सांगितले की, 'मोदीसाहेबांनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या. ज्या माणसाला गरज आहे त्याची ती गरज भागली पाहिजे, तो स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, स्वाभिमानाने जीवन जगला पाहिजे, अशा योजना मोदींनी आणल्या. महिलांसाठी योजना, बाराबलुतेदारांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी योजना केल्या. एक घटक असा राहिला नाही की त्यांच्यासाठी मोदींनी योजना आणल्या नाहीत.'

'फरक ऐवढा झाला की या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो. या योजना जनतेपर्यंत पोहचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते. मग आपल्याला अशा बैठका घेऊन लाभार्थ्यांकडे जा हे करा ते करा असं करण्याची वेळच आली नसती. पण जे झालं ते झालं.', असे विजयकुमार गावित यांनी सांगितले. मंत्री विजयकुमार गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT