Dhule Lok Sabha Election 2024 News: NCP Sharad Pawar Group's Objection Over BJP Campaigning At Dhule Polling Station Saan TV
लोकसभा २०२४

Dhule Lok Sabha: मतदान केंद्रावर उघडपणे भाजपचा प्रचार; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आक्षेप

Bharat Jadhav

(आरएनओ)

धुळे: आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात धुळे येथेही मतदान प्रक्रिया पार पडत असून येथे भारतीय जनता पक्षाकडून प्रचार केला जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी केलाय. धुळ्यातील साक्री रोड येथील स्वामी ठेऊराम हायस्कूल मतदान केंद्रात आचार सहिंतेचं उल्लंघन झालंय.

या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते बूथजवळ उभे राहून लोकांना हात जोडून प्रचार करताना आढळून आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आलाय. प्रचार करत असलेले अनेक व्हिडिओ आणि छायाचित्र मिळून आल्याचं सांगण्यात येत आहे. मतदान केंद्रात भाजपचा प्रचार करणारे भाजपचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून प्रचार केला जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत कुठलाही प्रचार करता येत नाही. कोणत्याही पक्षाच्या नगरसेवक आणि प्रतिनिधी प्रचार करू शकत नाही जिल्हाधिकारी यांचा आदेश असून देखील असा प्रकार पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रनजीत राजे भोसले यांनादेखील निदर्शनात आले. हा प्रकार पाहायला मिळाला या ठिकाणी होत असलेला गैरप्रकार लक्षात घेता त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केलीये.

मतदान केंद्राबाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे नेते भिडले

फरांदे आणि ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते आमनेसामने आलेत. केंद्रावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यानंतर भडकलेल्या आमदार फरांदे यांनी नीट बोल, तुमची जहांगिरी आहे का? असं म्हणत ठाकरे गटाचे वसंत गीते यांना जाब विचारला. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाला.

मालेगावमध्ये गावकऱ्यांनी फिरवली पाठ

नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. नाशिकमधील सर्वच ठिकाणी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एका गावाने मतदानावर बहिष्कार टाकलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT