Thane Lok Sabha: भयंकर राग! ईव्हीएम मशीन बंद म्हणून डोंबिवलीकर काका संतापले, मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ

Thane Lok Sabha Election 2024: ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनला खोळंबा होत असल्याचं समोर येत आहे. EVM बंद म्हणून एक काका चांगलेच संतापले आहेत.
ईव्हीएम मशीन बंद
Thane Lok SabhaSaam Tv

राज्यात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनला खोळंबा होत असल्याचं समोर येत आहे. मुंबईत देखील असाच प्रकार घडला आहे. EVM बंद म्हणून एक काका चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ईव्हीएम मशीन बंद म्हणून राग व्यक्त केला आहे. हे काका डोंबिवलीतील असल्याचे माहिती मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीकर काकांचा संताप पाहायला मिळाला आहे. मशीन सकाळपासून अजूनपर्यंत सुरू नाही. सकाळी साडेसहा वाजल्यापासून लोकं रागेत उभी आहेत. सारखं बाहेर काढा, बाहेर काढा चाललं आहे. इथे आणखी किती वेळ लोकं उभी राहणार? असा सवाल या संतप्त काकांनी विचारला (Thane Lok Sabha) आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. १३३ नंबर खोली क्रमांक २ मंजुनाथ शाळा येथील मशीन सकाळपासून बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता संपूर्ण भागात फक्त दोन इंजिनियर असल्याचं सांगत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया या काकांनी दिली आहे. आज राज्यात लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान (Thane Lok Sabha Election 2024) पार पडत आहे. डोंबिवलीत सकाळपासून एक ईव्हीएम मशीन बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन बंद असल्याचा परिणाम मतदानावर होत ( EVM Machine) आहेत.

ईव्हीएम मशीन बंद
Maval Lok Sabha Voting: 100 टक्के मतदान करा! लग्नाआधी मतदान करणाऱ्या नवरदेवाचं आवाहन ऐकण्यासारखंय, एकदा बघाच

मतदारांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएम मशिनचा खोळंबा झाला आहे. मतदान केंद्राबाहेर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मशीन दुरूस्तीचे काम सुरू आहे. पूर्वेकडील मंजुनाथ (Thane News) शाळेमधील मतदान केंद्रातील एक ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदार वैतागले आहेत. ठाण्यातील नौपाडा तर नाशिकमधील आडगाव मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं देखील समोर आलं आहे.

ईव्हीएम मशीन बंद
Politicians Who Voted For Election: लोकशाहीचा उत्सव! राज्यातील बड्या नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, पाहा फोटो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com