congress leader abhay patil criticizes prakash ambedkar Saam Digital
लोकसभा २०२४

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची परस्परविरोधी भूमिका, अकाेल्यात भाजपला पूरक मदत : डाॅ. अभय पाटलांचा गंभीर आराेप

congress leader abhay patil criticizes prakash ambedkar : अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचे परस्परविरोधी भूमिका दिसून आल्याचे डाॅ. अभय पाटील यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

अकाेला लाेकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी त्यांचे पराभवाचे खापर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर फाेडलं आहे. डाॅ. पाटील यांनी आंबेडकर यांच्यावर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. अभय पाटील म्हणाले अकाेला लाेकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपाला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुक कालावधीत अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केले. त्यामुळे काॅंग्रेसची हक्काच्या जागेवर पराभव स्विकारावा लागला.

या मतदारसंघात मतदारांनी सन 2019 च्या तुलनेत आंबेडकरांचा मताधिक्य घटवल्याचा टोला अभय पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. दरम्यान आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करून पुढची दिशा ठरवणार असल्याचा अभय पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- मार्च महिन्यात १८०० पीएमपी बस पडल्या बंद प्रवाशांना मनस्ताप

Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

आपवर ईडीची नजर! राज्यसभा खासदारावर मोठी कारवाई, निवासस्थानासह ८ ठिकाणी EDची छापेमारी

प्रेमसंबंधातून थरकाप उडवणारा खून! तरुणीला विष देऊन संपवलं अन्…

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT