Congress Candidates List Saam tv
लोकसभा २०२४

Congress Candidates List: काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर, राज्यातील 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Pramod Subhash Jagtap

Lok Sabha Election 2024:

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने या यादीत एकूण 46 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राज्यातील 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्यांचा समावेश आहे.

चौथ्या यादीत काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना संधी दिली आहे. तसेच नागपूर येथून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान आणि गोंदिया- भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोले यांना संधी देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसच्या नवीन यादीनुसार, उत्तर प्रदेशात काँग्रेसचे प्रमुख अजय राय हे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहेत. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशच्या राजगढ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर यूपीतील अमरोहा येथून दानिश अली आणि सहारनपूरमधून इम्रान मसूद यांना तिकीट देण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील एकूण नऊ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सपासोबत युतीत काँग्रेस यूपीत फक्त 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. फतेहपूर सिक्री मतदारसंघातून रामनाथ सिकरवार, कानपूरमधून आलोक मिश्रा, झाशीतून प्रदीप जैन, बाराबंकीमधून तनुज पुनिया, देवरियातून अखिलेश प्रताप सिंग, बांसगावमधून सदन प्रसाद, वाराणसीतून अजय राय यांना तिकीट देण्यात आले आहे. उत्तराखंडच्या नौनिताल-उधम सिंग नगर मतदारसंघातून प्रकाश जोशी आणि वीरेंद्र रावत यांना हरद्वारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने प्रिया रॉय चौधरी यांना पश्चिम बंगालच्या कूचबिहार मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

लाल सिंह यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधून, तर रमण भल्ला यांना जम्मूमधून तिकीट देण्यात आले आहे. कावासी लखमा छत्तीसगडच्या बस्तर मतदारसंघातून उमेदवार असतील. याशिवाय तामिळनाडू, मणिपूर, मिझोराम, आसाम, अंदमान निकोबार, राजस्थानमधूनही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT