Raju Shetti, Ravikant Tupkar News saam tv
लोकसभा २०२४

Ravikant Tupakar News: राजू शेट्टी माझे गुरु नाहीत, रविकांत तुपकर यांची स्पष्टोक्ती; लोकसभा लढण्याचीही घोषणा

Ravikant Tupkar On Raju Shetti: माझे शेतकरी चळवळीतील गुरु हे राजू शेट्टी नसून शरद जोशी आहेत, तसेच राजू शेट्टी हे सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदलत असतात, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १९ मार्च २०२४

Ravikant Tupkar News:

माझे शेतकरी चळवळीतील गुरु हे राजू शेट्टी नसून शरद जोशी आहेत, तसेच राजू शेट्टी हे सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदलत असतात. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेशी मी सहमत नाही, असं थेट स्पष्टीकरण देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी आणि त्यांची भूमिका वेगळी असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले रविकांत तूपकर?

"मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. गावगाड्यातील सामान्य लोकांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जनतेचा आग्रह आहे की, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी. लोकांनी आग्रह केला की, या निवडणुकीत तुम्ही उतरायचं आहे. त्यांच्याच आग्रहामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अतिशय जोरदार तयारी आमची सुरू आहे. लोक भरभरून वर्गणीही देत आहे," असे रविकांत तूपकर म्हणालेत.

लोकवर्गणीतून निवडणूक लढणार..

तसेच "मी प्रस्थापितांसारखा निवडणूक लढवणार नाही, कारण मी चळवळीतला फाटका कार्यकर्ता आहे. गावागावातून एक लाख, दोन लाख रुपयांची वर्गणी माझ्यासाठी देत आहेत. माझा बुलढाण्याचा दौरा संपलेला आहे. प्रस्थापित राजकारण्यांना लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे चांगल्या चेहऱ्याच्या शोधात लोक आहेत. आम्ही जो 22 वर्ष चळवळीतून संघर्ष केला, त्या संघर्षाचं चीज झालं पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे," असे स्पष्टीकरणही रविकांत तुपकर यांनी दिले आहे.

राजू शेट्टी माझे गुरू नाहीत..

तसेच "माझे गुरू शेतकरी चळवळीतले स्वर्गीय शरद जोशी आहेत. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो, त्यावेळी मी शरद जोशींच्या संपर्कात आलो. त्यावेळी मी त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. मला जे काही चळवळीचे धडे मिळाले, ते स्वर्गीय शरद जोशींकडून मिळाले. निश्चितच मी राजू शेट्टींच्या संघटनेत काम करत होतो, काम करतोय. पण त्यांची भूमिका सातत्यानं बदलत असते.

राजू शेट्टींची भूमिका संशयास्पद...

"आधी ते म्हणत होते की, आम्ही 6 जागांवर स्वतंत्र लढू, त्यानंतर म्हणाले की, महाविकास आघाडीनं मला एकट्याला पाठिंबा दिला, तर बाकीच्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजेच, त्यांची भूमिका फारच संशयास्पद आहे. त्यांनी भूमिका तशीच असते. त्यात काही नवीन आहे असं नाही.", असे म्हणत तुपकर यांनी राजू शेट्टींच्या भूमिकेशी सहमत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT