Digvijay Yodha Pagadi Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi Pagadi: पंतप्रधान मोदींसाठी खास 'दिग्विजय योद्धा पगडी', पुण्यात होणार भव्य स्वागत

Digvijay Yodha Pagadi: पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Pagadi:

>> सचिन जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात रेस कोर्स येते भव्य सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे.

दिग्विजय योद्धा पगडी अस या पगडीला नाव देण्यात आले आहे. संपूर्ण कॉटनची, संपूर्ण हाताने घडवलेली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत.

ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स,शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. तसेच दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर येथे सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''काँग्रेस आपल्या लाजिरवाण्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा भाग म्हणून एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घेत आहे. आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या गोष्टींच्या विरोधात काँग्रेसला धर्मावर आधारित आरक्षण वाढवायचे आहे.''

मोदी म्हणाले आहे की, आम्ही ओबीसींसाठी राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू केले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण दिलं.'' ते म्हणाले, स्वतः बाबासाहेब आंबेडकरही आता संविधान बदलू शकत नाहीत, हे मी आधीच सांगितले आहे. मीही बदलू शकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

SCROLL FOR NEXT