Navneet Rana Banner Removed By Election Commission Saam Tv
लोकसभा २०२४

Navneet Kaur Rana: नवनीत राणा यांचे बॅनर हटवले, परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई

Priya More

Amravati Loksabha Election 2024:

भाजपकडून (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) उभ्या राहिलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे बॅनर निवडणूक आयोगाने काढून टाकले आहेत. विनापरवाना बॅनर लावल्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. अमरावतीलच्या चांदूर बाजार येथे हे बॅनर लावण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बॅनरवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करत नवनीत राणा यांचे बॅनर काढून टाकले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील तळवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बॅनर लावण्यात आले होते.

तळवेल ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांचे तळवेल गाव असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असल्याने हा प्रकार घडला असल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नवनीत राणा या अमरावतीच्या स्वाभिमान पक्षाच्या खासदार होत्या. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. नवनीत राणा यांच्यासोबत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT